31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; पोलिसांकडून मुंबईत येणाऱ्या वाहनांची तपासणी

| Updated on: Dec 31, 2021 | 9:49 AM

पोलीस बाहेरून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. जे वाहनचालक कोरोना नियमांचे आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

मुंबई : मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील शहरात शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याने मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईच्या वेशीवर रात्रीपासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, मुलुंड टोलनाक्यावर पोलीस मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.

Published on: Dec 31, 2021 09:47 AM
नितेश राणे यांच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये पोस्टरबाजी
Nitesh Rane | ‘हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस,’ जागोजागी नितेश राणेंच्या फोटोचे बॅनर, नवा वाद पेटणार?