VIDEO : Mumbai | वादग्रस्त वक्तव्यामुळे सेना आक्रमक, मुंबईत शिवसैनिकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
नाशिकमध्ये शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चे काढले. नाशिक शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन करत नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर मुंबईत शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चे काढले. नाशिक शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन करत नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर मुंबईत शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, ठाणे पाठोपाठ नागपूरमध्ये देखील शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नागपूरच्या धंतोली येथील भाजपच्या विभागीय कार्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरादर घोषणाबाजी करण्यात आली.