Narayan Rane : नारायण राणेंच्या बंगल्यावर पोलिसांची नोटीस, राणेंच्या घरातील कर्मचाऱ्याने नोटीस काढली

| Updated on: Dec 29, 2021 | 4:48 PM

भाजप आमदार नितेश राणे बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या घरावर पोलिसांनी नोटीस लावली आहे. नितेश राणेंना हजर करा किंवा स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहा, अशी सूचना या नोटिशीत देण्यात आली आहे. मात्र, नोटीस लावून दहा मिनिटं होत नाही तोच राणेंच्या कर्मचाऱ्यांनी ही नोटीस काढून टाकली.

भाजप आमदार नितेश राणे बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या घरावर पोलिसांनी नोटीस लावली आहे. नितेश राणेंना हजर करा किंवा स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहा, अशी सूचना या नोटिशीत देण्यात आली आहे. मात्र, नोटीस लावून दहा मिनिटं होत नाही तोच राणेंच्या कर्मचाऱ्यांनी ही नोटीस काढून टाकली. त्यामुळे आता राणे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याची माहिती मिळावा म्हणून कणकवली पोलीस नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. मात्र, त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. त्यानंतर पोलीस राणेंच्या कणकवली येतील निवासस्थानी आले. पोलिसांनी राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर नोटीस लावली. दुपारी 3 वाजता ही नोटीस लावण्यात आली. ही नोटीस लागल्यानंतर मीडियाला याची वार्ता कळताच मीडियाने बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. अवघ्या दहा मिनिटातच राणेंच्या कर्मचाऱ्याने ही नोटीस काढून टाकली.

Aaditya Thackeray | 31 डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी निर्बंध असतील : आदित्य ठाकरे
Devendra Fadnavis | नोटीस चिटकवण्याचा प्रकार चुकीचा, भाजप राणेंच्या पाठीशी भक्कमपणे उभी : फडणवीस