फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा, गुन्हा दाखल होणार?
पोलिसांनी या तोडफोड कऱणाऱ्या अज्ञात महिलेच्या घरचा पत्ता शोधून काढला आहे. पोलिसांचं पथक संबंधित महिलेच्या घराबाहेर पोहोचले आहे. यामध्ये महिला पोलिसांचा देखील मोठा समावेश आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा या महिलेच्या इमारतीच्या खाली आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाच ते सहा महिला पोलीस कर्मचारी देखील या महिलेच्या घराबाहेर उभे आहेत. सातत्याने दरवाज्याची बेल वाजवून देखील ही महिला दार उघडत नसल्याची माहिती मिळतेय. तर महिला पोलिसांकडून महिलेला घराचा दरवाजा उघडण्याची विनंती केली जात आहे. पण महिला दरवाजा उघडत नाही. दरम्यान, या महिलेचं पोलिसांकडून समुपदेशन केले जाण्याची शक्यता आहे. या महिलेने काल संध्याकाळी मंत्रालयात जात सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एकच गोंधळ घातला. या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी फेकली. तसेच तिथल्या कुंड्या देखील फोडल्या आणि पोबारा केला. दरम्यान, महिलेचा तोडफोड करतानाचा व्हिडीओ आज समोर आला आहे. यानंतर पोलिसांनी या अज्ञात महिलेचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. बघा नेमकं काय घडतंय?