मुंबईतील कुर्ला येथे मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, फिनिक्स मॉलबाहेर बाचाबाची

| Updated on: Nov 27, 2023 | 12:21 PM

पुन्हा एकदा मनसे आक्रमक, चांदीवलीचे मनसे विभाग प्रमुख महेंद्र भानुषाली यांनी कुर्ला येथील फिनिक्स मॉलमध्ये जाऊन ज्या-ज्या दुकानांवर मराठीमध्ये साईन बोर्ड नाहीत त्याला काळं फासण्याचा थेट इशारा दिल्यानंतर पोलिसांकडून या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३ : मनसे कायमच मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने 25 नोव्हेंबरची डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन संपल्यामुळे मनसे आक्रमक झालीये. ज्या दुकानांवर मराठी पाट्या नाहीत, त्या पाट्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासत आंदोलन केलं. रविवारी सकाळीच दहिसर, ठाण्यात मनसेचं खळखट्ट्याक पाहायला मिळालं तर आज मुंबईच्या कुर्ला येथे मराठ्या पाट्यांसाठी मनसे आक्रमक झालीये. कुर्ला फिनिक्स मॉल बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला असून पोलीस अधिकारी मॉल बाहेर तैनात करण्यात आलेत. चांदीवलीचे मनसे विभाग प्रमुख महेंद्र भानुषाली यांनी मॉलमध्ये जाऊन ज्या-ज्या दुकानांवर मराठीमध्ये साईन बोर्ड नाहीत त्याला काळं फासण्याचा थेट इशारा दिल्यानंतर पोलिसांकडून या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय. तर 28 नोव्हेंबरपासून ज्या-ज्या दुकानदारांनी मराठीत पाट्या लावल्या नसतील त्यांच्यावर मनपाकडून दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, प्रांतवाद आणि मराठी भाषेचा मुद्दा घेत पुन्हा एकदा मनसे आक्रमक झाल्याने आज खळ्ळखट्याक करणार का पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Published on: Nov 27, 2023 12:21 PM
आगामी निवडणुकांच्या निमित्तानं ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी, ‘या’ 10 नेत्यांवर कोणत्या विभागाची जबाबदारी?
26/11 च्या रात्री मुंबईत दहशतवादी शिरले, मुंबई पोलिसांना कुणी केला फोन अन्…