समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून… भर समुद्राच्या लाटांमध्ये अडकलं दाम्पत्य अन्…

| Updated on: Dec 11, 2024 | 1:53 PM

रत्नागिरीच्या समुद्रकिनारी मौज-मजा करणाऱ्या दाम्पत्याची मृत्यूच्या दाढेतून थरारकरित्या सुटका करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी संध्याकाळी रत्नागिरीजवळच्या भाटये बीचवर घडला. संपूर्ण घटनेचे थरारक व्हिडीओ आता समोर येत आहेत. अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या दाम्पत्याची मच्छीमारांच्या मदतीने पोलिसांनी सुटका केली आहे.

रत्नागिरीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रत्नागिरी मधील एका समुद्राच्या पाण्याशी खेळण्याचं धाडस करणं अंगलट आल्याच्या प्रकार समोर आला आहे. सध्या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ समोर आला आसून खोल समुद्राच्या भरतीच्या पाण्यात एक दाम्पत्य अडकलं होतं. हे दाम्पत्य आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत असताना त्यांची थरारक सुटका करण्यात आली. रत्नागिरीच्या समुद्रकिनारी मौज-मजा करणाऱ्या दाम्पत्याची मृत्यूच्या दाढेतून थरारकरित्या सुटका करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी संध्याकाळी रत्नागिरीजवळच्या भाटये बीचवर घडला. संपूर्ण घटनेचे थरारक व्हिडीओ आता समोर येत आहेत. अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या दाम्पत्याची मच्छीमारांच्या मदतीने पोलिसांनी सुटका केली आहे. भर समुद्रात मच्छिमारी करणारे बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये यांनी या दाम्पत्याचा जीव वाचवला. हे दोघेही त्या दाम्पत्यासाठी देवदूतच ठरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, तुम्हालाही कोकणातील समुद्र किनारी फिरण्याची आवड असेल किंवा कोकणात फिरायला जाताना आणि समुद्रकिनारी मौज-मजा करताना जरा जपून, असा संदेश पोलिसांकडून या घटनेनंतर देण्यात आला आहे.

Published on: Dec 11, 2024 01:53 PM
Kurla BEST Accident : ‘…म्हणून गोंधळ झाला’, कुर्ला बेस्ट अपघातातील आरोपी बस चालकचा जबाब अन् उडाली खळबळ
Ladki bahin yojana : पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार ‘लाडक्या बहिणी’ अपात्र, कारण नेमकं काय?