पण ‘मनसे’ने दिलसे काम केलं नाही, राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांचं नेमकं मत काय?

| Updated on: Jun 01, 2024 | 5:44 PM

राज ठाकरेंनी दिलेल्या पाठिंब्यानंतर महायुतीच्या प्रचारसभांमध्ये मनसे नेते, पदाधिकारी उतरले होते. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बाहेरुन पाठिंबा दिला, त्याचा फायदा होईल का? असा सवाल राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की....

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यातून महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरेंनी दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीला काहीसं बळ मिळालं असंही म्हटलं जात आहे. राज ठाकरेंनी दिलेल्या पाठिंब्यानंतर महायुतीच्या प्रचारसभांमध्ये मनसे नेते, पदाधिकारी उतरले होते. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बाहेरुन पाठिंबा दिला, त्याचा फायदा होईल का? असा सवाल राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “माझ्या मते मनसे ना जमेत ना खर्चात. मनेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्याच दिसलं नाही. माझं बऱ्यापैकी लक्ष होतं. मित्रांशी चर्चा झाली, स्टेज शो व्यतिरिक्त, राज ठाकरेंच्या सभेव्यतिरिक्त मनसे कार्यकर्ते दिसले नाहीत. ठाणे, कल्याण-डोंबिवलीत मी राहतो, मला मनसे कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्याचं दिसलं नाही. मनसेचा फायदा होणार नाही. 2019 साली विरोधात होते, तेव्हा तोटा झाला नाही आणि फायदा झाला नाही. तेव्हा 41 जागा आल्या होता. मात्र आता फायदा होईल, असं वाटत नाही”, असं स्पष्ट मत अनिल थत्ते यांनी व्यक्त केलं.

Published on: Jun 01, 2024 05:44 PM
कोकण किनारपट्टीवर Monsoon सक्रिय, महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री
महाराष्ट्रात कुणाचा जोर? प्रचाराच्या रणनितीदरम्यान भाजपच्या अंगलट काय आलं? विश्लेषक संजीव उन्हाळेंचं भाकीत काय?