पक्ष फुटीनंतर पुण्याचा ‘दादा’ कोण? शिरूर मतदारसंघात राजकीय बॅनरवॉर

| Updated on: Feb 20, 2024 | 2:01 PM

पमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी दादा म्हणजे फक्त अजित पवारच होते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पुण्याच्या दादांची जागा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार घेत असल्याची चर्चा

पुणे, २० फेब्रुवारी २०२४ : उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी दादा म्हणजे फक्त अजित पवारच होते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पुण्याच्या दादांची जागा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार घेत असल्याची बँनरबाजी मंचर कळंब येथे करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. “वादा तोच..! पण दादा नवा”… अशी टँगलाईन देऊन रोहित पवारांचे बँनर पुणे नाशिक महामार्गावर झळकले. याचं कारणही तसंच आहे. उद्या शरद पवारांची मंचर येथे सभा होणार आहे. या सभेसाठी मी येतोय असा संदेश दिला जातोय तर दुसरीकडे वादा तोच..! पण.. दादा नवा..! अशा टँगलाईनचे बँनर झळकल्याने चर्चा सुरु झाली. पुण्याच्या दादाची जागा आता रोहित पवार घेत आहेत का…? अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

Published on: Feb 20, 2024 02:01 PM
तर ओबीसी समाज पेटून उठेल, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा थेट इशारा
विधानसभेतही मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…