गारूडी, सुपारी बहाद्दर अन् ढोंगी, बच्चू कडू-राणा दाम्पत्यांमध्ये टोकाची टीका; कोणी काय केला हल्लाबोल?

| Updated on: Sep 02, 2024 | 11:28 AM

अमरावतीच्या चांदुरबाजार मतदारसंघात प्रहार संघटनेकडून भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर टीकास्त्र डागलंय. तर तुमच्या सारखं आम्ही कुणाच्या पाठिंब्याने निवडून येत नाही, असं म्हणत बच्चू कडूंनी पलटवार केलाय.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीमध्ये बच्चू कडूंविरूद्ध नवनीत राणा दाम्पत्य असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. प्रहार संघटना आणि राणा दाम्पत्याकडून अमरावतीमध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यातूनच बच्चू कडू आणि नवनीत राणा यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार टीका-टिप्पणी केली. तर रवी राणा यांच्याकडून नवनीत राणांच्या उमेदवारीचे अप्रत्यक्षपणे संकेतही देण्यात आले आहे. दरम्यान, बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच बच्चू कडू विरूद्ध राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलाय. सुपारीबहाद्दराना अचलपूर मतदारसंघ २० वर्ष मागे नेल्याचं म्हणत नवनीत राणांनी बच्चू कडूंवर टीका केली आहे. तर या टीकेवर बच्चू कडू यांनीही पलटवार केला आहे. आलतू-फालतू लोकांवर मी बोलत नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

Published on: Sep 02, 2024 11:28 AM
Maharashtra Rain : मराठवाडा-विदर्भात मुसळधार पावसाचा रूद्रावतार, कोणत्या भागाला झोडपलं?
Maharashtra Weather : राज्यात पुन्हा धो-धो बरसणार, ‘या’ भागात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस