विशाळगडाच्या अतिक्रमणावरून रंगतोय राजकीय वाद, नेमका कुणाचा हात?

| Updated on: Jul 17, 2024 | 11:12 AM

विशालगडाच्या पायथ्याच्या गावात तोडफोड करणाऱ्या ५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यावरून एमआयएमच्या जलील यांनी संभाजीराजेंवर तर प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडेंवर बोट दाखवलंय. इतकंच नाहीतर विरोधकांनी हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केलंय...

Follow us on

विशालगडाच्या अतिक्रमणावरून राजकीय वाद सुरू झालाय. जमावाने गडापासून ३ किमी दूर असलेल्या एका गावात तोडफोड केली. विशालगडाच्या पायथ्याच्या गावात तोडफोड करणाऱ्या ५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यावरून एमआयएमच्या जलील यांनी संभाजीराजेंवर तर प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडेंवर बोट दाखवलंय. इतकंच नाहीतर विरोधकांनी हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केलंय. मात्र इतकं जमाव पोलिसांच्या बंदोबस्तानंतर कसा काय आक्रमक होतो? विशालगडाच्या पायथ्याच्या गावात होणारी तोडफोड नियंत्रणात का आली नाही? याचं उत्तर सरकार किंवा गृहविभागाकडे नाही. अतिक्रमण आहे विशालगडावर…आणि जमावाने तोडफोड झाली ३ किलोमीटर लांब असलेल्या गजापूर गावात… या गावाचा अतिक्रमणाशी संबंध नव्हता पण तरीही या गावाच्या गाड्या जाळल्या, दुकानं घरांची हिंसक जमावाने तोडफोड केली. पोलीस तैनात असून कायदा कोणी हातात घेतला? ज्यांचा अतिक्रमणाचा काही संबंध नाही, त्यांना लक्ष्य का केलं गेलं? असा सवाल विरोधकांनी केलाय.