Special Report | वादाचा कलगीतुरा, गौतमीच्या ‘पाटील’ आडनावाच्या वादात राजकीय नेत्यांची उडी

| Updated on: May 28, 2023 | 8:10 AM

VIDEO | 'संजय राऊत हे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील', कुणी केला हल्लाबोल, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : गौतमीच्या पाटील या अडनावावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीत गौतमीला पाठिंबा दिलाय. तर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या वेळेला आता गौतमी पाटील हिचा विषय चेडला जातोय. संजय राऊत हे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील असल्याची टीका नितेश राणे यांनी केलीये. गौतमीच्या समर्थनात जळगावचा मराठा संध उभा राहिल्यानंतर अनेकांनी तिला पाठिंबा दिलाय. गौतमीचं नाव पाटील नाहीतर चाबुकस्वार आहे, मात्र पाटील अडनाव लावून गौतमी समस्त पाटलांचा अपमान असल्याचे म्हटले गेले. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी गौतमी पाटील हिच्या समर्थनात पोस्ट करत पाठिंबा दिला. गौतमी पाटीलला असलेले पाटील आडनावच काढून टाकायला सांगितले जात आहे. इथेही बाब उल्लेखनीय आहे की नृत्यांगना असणाऱ्या माधुरी दीक्षित यांना कधीही दीक्षित आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही. अगदी माधुरी पवारला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का बरं..? असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 28, 2023 08:10 AM
आधी कांद्यानं रडवलं आता कंबरडं मोडल; अवकाळीमुळे कांदा सडला? शेतकऱ्याची आर्थिक कोंडी
New Parliament : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचा उद्धाटन, कसा असणार कार्यक्रम?