Special Report | जेल का खेल नेमका कसा रंगत गेला? -Tv9

| Updated on: Feb 16, 2022 | 9:49 PM

राऊतांनी किरीट सोमय्या, सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. तर राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी थेट राणे पिता-पुत्रांचे आणि किरीट सोमय्यांचे काही व्हिडीओच दाखवले

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कधीकाळी मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. इतकंच नाही तर राऊतांनी किरीट सोमय्या, सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. तर राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी थेट राणे पिता-पुत्रांचे आणि किरीट सोमय्यांचे काही व्हिडीओच दाखवले! विनायक राऊत म्हणाले की, संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहे. बाळासाहेबांनीच त्यांना नेते केलं होतं. बाळासाहेबांनी राणेंना नेतेपद कधीही दिलं नाही. कारण हा माणूस सत्तापिपासू आहे हे त्यांना माहिती होतं. त्यातून राणेंची लायकी दिसून आली. संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत, त्याचबरोबर ते आमचे नेते आहेत. ईडीद्वारे त्यांना त्रास दिला गेला. पण ते खऱ्या अर्थाने शिवसैनिक असल्यामुळे निधड्या छातीनं सेनाभवनात पत्रकार परिषद घेतली. त्याउलट राणेंच्या मागे जेव्हा ईडी लागली तेव्हा ते आणि त्यांचे चिरंजीव दिल्लीला गेले आणि चोर वाटेनं भाजप नेत्यांच्या समोर लोटांगण घातलं, अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी राणेंवर केलीय. त्याचबरोबर ‘आज राणे यांना भाजप प्रेमाचा, मोदी प्रेमाचा कंठ फुटला आहे तो किती बेगडी आहे हे दिसून येतं. राणेंनी एक लक्षात घ्यावं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना कोरोनाचा काळ असूनही सर्व देशवासियांनी आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाच मुख्यमंत्र्यांमध्ये दोन वेळा उद्धव ठाकरेंना नामांकन मिळालं आहे. त्यात भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही’, असंही राऊत म्हणाले.

Special Report | बेवड्या, दलाल, भंगारवाला आणि सोनं चोर, कोण काय म्हटलं? कुणी कुणाला चॅलेंज दिलं?
Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 16 February 2022