Special Report | मौका सभी को मिलता है, ‘सत्या’ चित्रपटातील डॉयलॉगमधून नितेश राणेंना काय सांगायचंय?
कर्ज थकवल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्या विरोधात लूकआऊट सर्क्यूलर जारी करण्यात आलं आहे.
कर्ज थकवल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्या विरोधात लूकआऊट सर्क्यूलर जारी करण्यात आलं आहे. त्यावरुन आता ‘मौका सभी को मिलता है’ हा ‘सत्या’ चित्रपटातील डायलॉग ट्विट करुन नितेश राणे यांनी सत्ताधारी शिवसेनेला इशारा दिला आहे. दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर खोचक टीका केली आहे. केंद्राच्या गृहखात्याच्या सूचनेवरूनच राज्याच्या गृहखात्याने ही कारवाई केली आहे. हवं तर नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी, असा खोचक टोलाही विनायक राऊत यांनी लगावला. या प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !