बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान राडा, पोलीस आणि कार्यकर्ते कुठं भिडले?
VIDEO | बाजार समिती निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर पोलीस आणि कार्यकर्त्यांत राडा, कोणत्या मतदान केंद्रावर पोलिंग एजंटलाच केली मारहाण?
बीड : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातील मतदान आज होत आहे. बीडच्या पाटोदा- शिरूर आणि माजलगाव बाजार समितीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. पाटोदामध्ये भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी आमदार बाळासाहेब आजबे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे तर ते मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, आष्टी- कडा बाजार समिती सुरेश धस यांनी बिनविरोध काढली असली तर पाटोदा- शिरूर बाजार समिती निवडणुकीत मात्र मोठे आव्हान आहे. सुरेश धस हे सकाळपासून मतदान केंद्राबाहेर ठाण मांडून बसले आहेत. अशातच बीडच्या पाटोदा बाजार समिती निवडणुकीत गैर प्रकार घडल्याचे समोर आले. पाटोदा बाजार समिती निवडणुकीच्या मतदान केंद्रावर पोलीस आणि कार्यकर्त्यांत राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिंग एजंटला आमदार सुरेश धस यांच्या समोर पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. तर पोलीस आणि कार्यकर्ते आपापसात भिडल्याने या मतदान केंद्रावर राडा झाल्याचे पाहायला मिळाले.