फिरायला जाताय सावध! मुंबईपासून वेंगुर्ल्यापर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांची मोठी अपडेट काय?
प्राग येथील चेक युनिव्हर्सिटी आँफ लाईफ सायन्सेस आणि मुंबईतील महराष्ट्र महाविघालय यांनी संशोधन केले. या संशोधनात मुंबई ते वेंगुर्ला अशा १७ ठिकाणच्या किनारपट्टीवरचे संशोधन करण्यात आले होते. १७ पैकी १५ किनारे प्रदुषित असल्याचा संशोधनातून निकष समोर आलेत
रत्नागिरी, १३ नोव्हेंबर २०२३ | कोकण किनारपट्टीवरील प्रदूषणदेखील आता धोकादायक पातळीवर गेल्याचे समोर आले आहे. कोकण किनाऱपट्टीवर बहुतांशी समुद्र किनारे प्रदूषित झाल्याचे समोर आले आहे. कोकण किनारपट्टी प्रदूषित करणाऱ्यांमध्ये सुक्ष्म प्लॅस्टिक आणि रसायनिक घटकांचा समावेश आहे. यामुळे किनारपट्टीवरील प्रदुषणामुळे सागरी जीवन आणि मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. प्राग येथील चेक युनिव्हर्सिटी आँफ लाईफ सायन्सेस आणि मुंबईतील महराष्ट्र महाविघालय यांनी संशोधन केले. या संशोधनात मुंबई ते वेंगुर्ला अशा १७ ठिकाणच्या किनारपट्टीवरचे संशोधन करण्यात आले होते. १७ पैकी १५ किनारे प्रदुषित असल्याचा संशोधनातून निकष समोर आलेत तर ७० टक्के उच्च ते मध्यम पर्यावरणीय धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुक्ष्म प्लॅस्टिक सोबत मेटोप्रोलोल, बिस्फोनेल ए, बिस्फोनेल एस असे घातक रसायनिक घटक समुद्राच्या पाण्यात असल्याने सागरी जीवन आणि मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही देखील फिरायला जात असाल तर काळजी घ्या