Pooja Dadlani | पूजा दादलानीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Pooja Dadlani | पूजा दादलानीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

| Updated on: Nov 08, 2021 | 9:38 PM

मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत पूजा ददलानीने मुंबई पोलिसांकडे आणखी वेळ मागितला आहे. पूजा ददलानी शाहरुख खानची मॅनेजर आहे.

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावले आहे. मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत पूजा ददलानीने मुंबई पोलिसांकडे आणखी वेळ मागितला आहे. पूजा ददलानी शाहरुख खानची मॅनेजर आहे. यापूर्वी, एका सायबर तज्ञाने आणि हॅकरने दावा केला होता की, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यासाठी पूजा ददलानीसह काही लोकांच्या व्हॉट्सअॅप चॅट्स एडिट करण्यासाठी दोन लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मनीष भंगाळे असे या हॅकरचे नाव आहे. दाखवलेल्या व्हॉट्सअॅप चॅटची बॅकअप फाइल आर्यन खानच्या नावावर असल्याचा दावा भंगाळे यांनी केला होता.

“पंढरपूर देशातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र व्हावं!”
Special Report | एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला?