पूनम पांडे हिचं वयाच्या 32 व्या वर्षी Cervical Cancer नं निधन
भिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पूनम पांडे हिचं Cervical Cancer म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन झाले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. पूनम पांडे हिच्या निधनाच्या बातमीला तिच्या टीमने दिला दुजोरा
मुंबई, २ फेब्रुवारी २०२४ : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पूनम पांडे हिचं Cervical Cancer म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन झाले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. पूनम पांडे हिच्या निधनाच्या बातमीला तिच्या टीमने दुजोरा दिला आहे. पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यात तिच्या मृत्यूविषयी सांगितले आहे. 2011 मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचच्या आधी पूनम पांडे ही सर्वाधिक चर्चेत आली होती. दरम्यान, 2013 मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून पूनम पांडे हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. या चित्रपटात तिने शिक्षिकेची भूमिका साकारली होती, जिचे तिच्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध असल्याचे दाखवण्यात आले होते.
Published on: Feb 02, 2024 01:01 PM