विधानसभेच्या निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी होणार?

| Updated on: Nov 21, 2024 | 3:59 PM

विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर समोर आलेल्या विविध संस्थांच्या एक्झिटपोल नुसार, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एक्झिट पोलच्या अंदाजानंतर समोर आलेल्या आकड्यांनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी होण्याची शक्यता..

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं मतदान नुकतंच पार पडलं. राज्यात २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर म्हणजे शनिवारी लागणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर समोर आलेल्या विविध संस्थांच्या एक्झिटपोल नुसार, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एक्झिट पोलच्या अंदाजानंतर समोर आलेल्या आकड्यांनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला दोन दिवस बाकी असताना मुंबईतील हॉटेल बुक होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे. आपल्या सर्व उमेदवारांना राजकीय पक्ष हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे. त्याकरता मुंबईसह इतर ठिकाणचे हॉटेल मोठ्या प्रमाणात बूक केली जाण्याची शक्यता आहे. बघा यासंदर्भातील अधिकची माहिती देणारा व्हिडीओ?

Published on: Nov 21, 2024 03:59 PM
Bacchu Kadu : विधानसभेच्या निकालाआधीच बच्चू कडूंचा सत्तास्थापनेबद्दल मोठा दावा, ‘आमच्याशिवाय सत्ता स्थापन….’
Sanjay Shirsat : राज्यात ‘गुवाहाटी पार्ट-2’ होणार? ‘गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर…’, संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?