राज्यातील ११ जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?

| Updated on: Oct 04, 2023 | 3:01 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली आहे. त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेलं तूतू-मैंमैं थांबलंय, पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून चंद्रकांतदादांची उचलबांगडी तर अजितदादांकडे आता पुण्याचं पालकमंत्री पद

Follow us on

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी नुकतीच जाहीर केली आहे. या नव्या यादी आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर आता अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आल्याचे समोर आले आह. या निर्णयामुळे पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेलं तूतू-मैंमैं अखेर थांबलं आहे. तर पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून चंद्रकांतदादा पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे आणि अजित पवार याना हे पद देण्यात आलं आहे. पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडून काढून घेतल्यामुळे त्यांना कोल्हापूरचं पालकमंत्री पद देण्यात येईल असं वाटत असताना चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.