आमचं ठरलंय… भाजपकडून नारायण राणेंचं सोशल मिडीयावर पोस्टर व्हायरल

| Updated on: Apr 02, 2024 | 5:31 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्टर व्हायरल केलेत. या व्हायरल होणाऱ्या पोस्टरमध्ये भाजपचे मंत्री नारायण राणे यांचा फोटो दिसतोय. आणि आमचं ठरलंय असा निर्धार व्यक्त करणारं घोषवाक्य त्यावर दिसतंय. यासह नेतृत्व... चौफेर विकासाचं, विश्वासाच आपुलकीचं सर्वसामान्यांचं....असं नारायण राणेंच्या फोटोसह म्हटलंय

सिंधुदुर्ग मतदारसंघात आमचं ठरलंय…आपला माणूस, आपला उमेदवार, आपला खासदार या आशयाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्टर व्हायरल केलेत. या व्हायरल होणाऱ्या पोस्टरमध्ये भाजपचे मंत्री नारायण राणे यांचा फोटो दिसतोय. आणि आमचं ठरलंय असा निर्धार व्यक्त करणारं घोषवाक्य त्यावर दिसतंय. यासह नेतृत्व… चौफेर विकासाचं, विश्वासाच आपुलकीचं सर्वसामान्यांचं….असं नारायण राणेंच्या फोटोसह म्हटलंय. दरम्यान, या व्हायरल होणाऱ्या या पोस्टरनंतर नारायण राणेंच्या लोकसभेच्या उमेदवारीवर भाजपकडून शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चाही दुसरीकडे रंगू लागल्या आहेत. तर मग किरण सामंत यांचा पत्ता कट झालाय का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. नारायण राणेंच्या या नव्या पोस्टरमुळे भाजप आणि शिंदे गटातील रस्सीखेच अद्याप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Apr 02, 2024 05:31 PM
लोकसभेचा अर्ज भरताना उमेदवारानं आणली पोतंभर चिल्लर, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछक
उन्मेष पाटील शिवबंधन हाती बांधणार? भाजप उमेदवार स्मिता वाघ यांची पहिली प्रतिक्रिया