Pune | कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीली स्थगिती

Pune | कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीली स्थगिती

| Updated on: Jan 01, 2022 | 12:43 AM

राज्यासह मुंबई, पुणे, नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात आज 8 हजारापेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत साडे पाच हजाराच्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर पुणे शहरात 412 नवे रुग्ण सापडले आहेत.

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव (Corona) पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. अशावेळी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सशर्त परवानगी दिल्यानंतर पुण्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं (Bullock Cart Race) आयोजन करण्यात आलं होतं. या दोन्ही स्पर्धा उद्या होणार होत्या. मात्र या स्पर्धांना पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. राज्यासह मुंबई, पुणे, नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात आज 8 हजारापेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत साडे पाच हजाराच्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर पुणे शहरात 412 नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यात सध्या 1 हजार 799 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी बैलगाडा शर्यत तात्पुरती स्थगित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय.

Special Report | नव्या वर्षात राज्यात पुन्हा लॉकडाऊनची चिन्हं ?
Pune | 31 डिसेंबर रोजी दारु नको दूध प्या, पुण्यातील सामाजिक संस्थांचा उपक्रम