पावसाळ्यापूर्वीच वाशिम जिल्ह्यात रस्त्यांची वाताहत, खड्डेमय रस्त्यांनी नागरिक त्रस्त
VIDEO | पावसाळ्याच्या आधीच वाशिम जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय; नागरिकांना नाहक त्रास
वाशिम : अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वाशिम जिल्ह्यातील रस्ते हे खड्डेमय झाले असून मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मालेगाव-रिसोड- हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या चार वर्षांपासून बंद पडलं आहे. या राष्ट्रीय महामार्गाचं मसलापेन ,किनखेडा, लिंगापेन या दरम्यान माहामार्गाची बिकट अवस्था झाली आहे. त्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे आणि गीट्टी दगडांमुळे मोटारसायकल सारखी वाहनं घसरुन पडत आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या माहामार्गावरील खड्डेमुळे अनेकांचे अपघात झाले आहेत. परंतु अद्याप ही माहामार्गाचं काम झालं नाही. या राष्ट्रीय महामार्गाचं काम लवकरात लवकर करण्यात अशी मागणी वाहनचालकांडून होत आहे.
Published on: Jun 06, 2023 04:26 PM