अशीही एक भक्ती! तब्बल ४० हजार रूद्राक्षांपासून साकारलं स्वामी समर्थांचं पोट्रेट
VIDEO | मुंबईतील जोगेश्वरीच्या भक्तांनी साकरली तब्बल ४० हजार पंचमुखी रुद्राक्षापासून श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा, बघा व्हिडीओ
सोलापूर : राज्यभरात आज श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमध्येही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात पहाटेपासून मोठी रांग लागली असून भाविक स्वामींचरणी नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, याठिकाणी एका स्वामी भक्ताची अनोखी भक्ती पाहायला मिळाली. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा तब्बल ४० हजार पंचमुखी रुद्राक्षापासून साकरली आहे. ४० हजार पंचमुखी रुद्राक्षापासून तयार केलेले स्वामी समर्थांचे भव्य पोट्रेट अक्कलकोट येथे प्रकटदिनाच्या निमित्ताने वटवृक्ष मंदिराला भेट दिले आहे. या पोट्रेटचे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली असून मुंबईतील पाच ते सहा कलाकारांच्या चमुने ही कलाकृती साकाराली आहे.