Amravati पालिकेत साफसफाईच्या कंत्राटावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने
बीएसपीचे नगरसेवक चेतन पवार आणि एमआयएमचे नगरसेवक अब्दुल नाझीम अब्दुल रौझ या दोन नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. यावेळी हे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर देखिल धावून गेले.
अमरावती : अमरावती महानगरपालिकेची शेवटची आमसभा आज पार पडली, परंतु ही आमसभा मात्र वादग्रस्त ठरली कारण साफ सफाईच्या कंत्राटावरून जोरदार राडा अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत झाला आहे. बीएसपीचे नगरसेवक चेतन पवार आणि एमआयएमचे नगरसेवक अब्दुल नाझीम अब्दुल रौझ या दोन नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. यावेळी हे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर देखिल धावून गेले. दरम्यान यावेळी महापौर चेतन गावंडे आणि आयुक्त डॉ प्रविण आष्टीकर हे सभागृहा बाहेर निघून गेले. त्यानंतर दहा मिनिटं आमसभा ही तहकुब करण्यात आली होती.