शेतातील पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड, लढवली अनोखी शक्कल
VIDEO | शेती पिकांना पाणी देण्यासाठी लढवली अनोखी शक्कल, काय केला जुगाड?
जळगाव : शेतातील पीक वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. चक्क ट्रॅक्टरच्या साह्याने वीज पुरवठा करून शेतकऱ्याने वेगळी शक्कल लढवल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात वीज पुरवठा शेतकऱ्यांना सुरळीत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी चक्क आपल्या शेती पिकांना पाणी देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. आपल्या ट्रॅक्टरला 20 हॉर्स पावरचे आर्मिचर जोडून त्यावर आपल्या शेतात असलेल्या शेतपंपाला वीज पुरवठा करून शेतीपंप चालवत आहे आणि आपल्या पिकांना पाणी देताना दिसून येत आहे. आपल्या शेती पिकाला वाचवण्यासाठी शेतकरी अनोखी शक्कल लढवतानाही दिसून येत आहे. अशाच प्रकारे ट्रॅक्टर आणि आर्मिचर जुगाड करून वीज निर्मितीचा प्रकार करताना शेतकरी दिसून येत आहे.
Published on: Jun 14, 2023 06:54 AM