Nitin Raut : उद्योजकांना वीजदरात सवलत मिळण्याची शक्यता, ऊर्जामंत्र्यांचे संकेत
नितीन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील उद्योगांना सुरु असलेली वीज दरातील सवलत यापुढेही सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकार अनुकूल आहे. यासाठी प्रस्ताव, सूचना आणि त्रुटींचा अभ्यास करुन अभ्यास गट अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील उद्योजकांना वीज दरात सबसिडी देण्यास यापुढेही राज्य सरकार अनुकूल आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. त्यामुळे राज्यातील उद्योगांना सुरु असलेली वीज दरातील सवलत यापुढेही सुरू ठेवली जाण्याची शक्यता आहे.