पैशाची देवाण-घेवाण झाल्याचं गोसावीने मान्य केलं, प्रभाकर साईलचे वकील तुषार खंदारेंचा दावा
के.पी. गोसावी यांनी आता मान्य केलेल आहे की ह्या सगळ्यामध्ये पैशाची देवाण-घेवाण झालेली आहे. त्यामुळे आता या देवाण-घेवाण मधील सर्व सत्य लवकरच बाहेर येईल. प्रभाकर वरती जे काही आरोप लावले आहेत ते सर्व आरोप चुकीचे आहेत, असं देखील तुषार खंदारे यांनी म्हटलंय.
एनसीबीनं मीडिया ट्रायल थांबवावी आणि आम्हाला कायदेशीर समन्स पाठवावं, असं प्रभाकर साईलचे वकील तुषार खंदारे यांनी म्हटलंय. तर, प्रभाकर NCB च्या चौकशीला सामोरे जाईलच परंतु एवढी मोठी केंद्रीय यंत्रणा कायद्याचं पालन करत नाही असंही खंदारे म्हणाले आहेत. एनसीबी ही केंद्रीय तपास यंत्रणा आहे परंतु ती यंत्रणा कायदेशीर काम करत नाही. एनसीबीनं मीडिया ट्रायल थांबवावी आणि आम्हाला कायदेशीर समन्स पाठवावं तर प्रभाकर NCB च्या चौकशीला सामोरे जाईल, परंतु एवढी मोठी केंद्रीय यंत्रणा कायद्याचं पालन करत नाही असा आरोप प्रभाकर साईलचे आरोप तुषार खंदारे यांनी केलाय. के.पी. गोसावी यांनी आता मान्य केलेल आहे की ह्या सगळ्यामध्ये पैशाची देवाण-घेवाण झालेली आहे. त्यामुळे आता या देवाण-घेवाण मधील सर्व सत्य लवकरच बाहेर येईल. प्रभाकर वरती जे काही आरोप लावले आहेत ते सर्व आरोप चुकीचे आहेत, असं देखील तुषार खंदारे यांनी म्हटलंय.