एक्झिट पोल म्हणजे बोगस… एक्झिट पोलच्या अंदाजावर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
एक्झिट पोलचे आकडे आणि खरा निकाल यात तफावत असते, एक्झिट पोलमध्ये फार काय खरे नसते. निकालाच्या दिवशी सर्व गोष्टी स्पष्ट होतील, अशी प्रतिक्रिया प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकाल येण्याच्या आधी आलेल्या एक्झिट पोलवर दिली आहे.
लोकसभा निकाल येण्यापूर्वी tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार अमरावतीतील उमेदवाराचा निकाल समोर आले आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि खरा निकाल यात तफावत असते, एक्झिट पोलमध्ये फार काय खरे नसते. निकालाच्या दिवशी सर्व गोष्टी स्पष्ट होतील, अशी प्रतिक्रिया प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकाल येण्याच्या आधी आलेल्या एक्झिट पोलवर दिली आहे. एक्झिट पोलनुसार आलेल्या अंदाजामुळे अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा या आघाडीवर आहे तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले बळवंत वानखेडे आणि प्रहारचे उमेदवार दिनेश बूब हे पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘तुमचे एक्झिट पोल म्हणजे बोगस. त्याला काही आधार नाही. अंदाज सांगण्याचा माझा अभ्यास नाही. आणि एक्झिट पोल देणारे काही ब्रम्हदेव नाही… अंदाज जो सांगतो ज्याचा अभ्यास असतो आमचा सामाजिक अभ्यास आहे,’, असे बच्चू कडू म्हणाले.