साडे 17 रुपयांची साडी अन्… बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर निशाणा काय? महायुतीत कुरघोडी सुरूच

| Updated on: Apr 02, 2024 | 12:48 PM

प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर रोख असल्याचे पाहायला मिळाले. राणांनी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांवर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. बघा बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर काय केला हल्लाबोल?

आमदार बच्चू कडू यांनी भाजपच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान, प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर रोख असल्याचे पाहायला मिळाले. राणांनी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांवर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. नवनीत राणाचा डिपॉझिट आम्ही जप्त करणार आहोत. आता तीर दूर गेलेला आहे. तो वापस येणार नाही, असे म्हणत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. बच्चू कडू म्हणाले, साडे 17 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जत केली गेली. आपण 2 कोटींच्या गाडीत फिरायचं आणि साडे 17 रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था करायची. परंतु ही साडे 17 रूपयांची साडी मतदारांचं मत परिवर्तन करू शकत नाही, असं वक्तव्य करत आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला.

Published on: Apr 02, 2024 12:48 PM
महायुतीचा तिढा सुटणार? लोकसभेच्या 48 जागांसंदर्भात उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
म्हणून मला खासदार व्हावं लागलं, नाव न घेता शरद पवारांवर रणजितसिंहांचं टीकास्त्र