नवनीत राणा प्रहारच्या तिकिटावर लढणार? बच्चू कडू यांचा लोकसभेच्या जागेबाबत मोठा दावा काय?

| Updated on: Jan 03, 2024 | 2:34 PM

लोकसभा निवडणुकीसाठी २ जागा आणि विधानसभेला १५ जागा लढवण्याची आमची तयारी आहे, असा मोठा दावा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. तर लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती आणि अकोल्याची जागा मागू शकतो, असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय

नागपूर, ३ जानेवारी २०२४ : येत्या काही दिवसांत लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी लोकसभेच्या जागांसंदर्भात मोठा दावा केला आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी २ जागा आणि विधानसभेला १५ जागा लढवण्याची आमची तयारी आहे, असा मोठा दावा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. तर लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती आणि अकोल्याची जागा मागू शकतो, असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय. तर खासदार नवनीत राणा आमच्या तिकीटावर लढल्या तरी काही हरकत नाही, असं मोठं वक्तव्यही बच्चू कडू यांनी केलंय. नवनीत राणा यांना प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढवू, नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा लढवू. अकोला, अमरावतीसह लोकसभेच्या तीन जागा हव्या, विधानसभेच्या १५ जागा लढवण्याची तयारी आहेत. तर १५ तारखेनंतर मिटिंग घेऊन भुमिका मांडू, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.

Published on: Jan 03, 2024 02:00 PM
Maratha Reservation : … तोपर्यंत जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम रहावं, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य काय?
गल्लीबोळात फिरून विचारतात पुढचा पंतप्रधान कोण पाहिजे? चंद्रशेखर बावनकुळे यांना कुणाचा टोला?