‘जिसके हाथ में चाबूक, उसकाही घोडा और उसकाही टांगा’, बच्चू कडू यांच्या विधानानं चर्चा
'विकासाच्या जाळ्यात अडकल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला. अशोकराव चव्हाण हे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे ते भाजपामध्ये का गेले? त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे, पण लोकांच्या मनात भ्रम आहे'
अमरावती | 14 फेब्रुवारी 2024 : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. विकासाचं जाळ आहे, त्या जाळ्यात ते अडकले आहेत. विकासाच्या जाळ्यात अडकल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला. अशोकराव चव्हाण हे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे ते भाजपामध्ये का गेले? त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे, पण लोकांच्या मनात भ्रम आहे. तुम्ही दोन वेळा मुख्यमंत्री असताना भाजपमध्ये का गेले? ते स्पष्ट झालं पाहिजे, असे म्हणत हे राजकारण आहे. जिसके हाथ में चाबूक रहता है उसकाही घोडा होता है. उसकाही टांगा होता है. अशोक चव्हाण हे विकासाच्या जाळ्यात अडकले आहेत. राजकारणात कुणी कुणाचा दोस्त किंवा दुश्मन नसतो. राजकारणात कुणी दोस्तीही करू नये आणि दुश्मनीही करू नये. मस्त आमच्यासारखे मध्यभागी राहावं, असं बच्चू कडू म्हणाले.