प्रकाश आंबेडकर यांना दंगलीची शंका; तर ओबीसींच्या लढ्याचा जनक मीच! नेमकं काय म्हणाले?
६ डिसेंबरनंतर दंगली होतील असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. या दंगलीच्या शंकेचा संदर्भ ओबीसी आरक्षणाच्या लढ्याशी लावला आहे. ६ डिसेंबरनंतर दंगली होतील, असे इनपूट पोलिसांना देण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३ : प्रकाश आंबेडकर यांनी दंगली संदर्भात शंका व्यक्त केली आहे. ६ डिसेंबरनंतर दंगली होतील असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. या दंगलीच्या शंकेचा संदर्भ ओबीसी आरक्षणाच्या लढ्याशी लावला आहे. ६ डिसेंबरनंतर दंगली होतील, असे इनपूट पोलिसांना देण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षणाच्या लढ्याशी संबंध नाही, असे काही जण लढाच ताब्यात घेऊन दंगली घडवू शकतात. ओबीसी आरक्षणावरून सध्या ओबीसी मेळावे होतायत. या मेळाव्यातून छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झालेत आणि आपली भूमिका मांडताय. या लढाच्या नेते भुजबळ असल्याने आपण सहभागी होत नाही का? असा सवाल पत्रकारांनी आंबेडकर यांना विचारला यावर ते म्हणाले, ओबीसींच्या लढ्याचा जनक मीच असल्याचे त्यांनी सांगितले.
Published on: Nov 29, 2023 12:15 PM