Prakash Ambedkar : 6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?

| Updated on: Nov 28, 2023 | 2:15 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलत असताना मोठा दावा केला आहे. 6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तर देशातील पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर देशात काहीही परिस्थिती उद्भवू शकते अशी शंकाही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

Follow us on

पुणे, २८ नोव्हेंबर २०२३ : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलत असताना मोठा दावा केला आहे. 6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तर देशातील पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर देशात काहीही परिस्थिती उद्भवू शकते अशी शंकाही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संविधानाबाबतचं वक्तव्य हे राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचं आणि सरसंघचालक मोहन भागवतांचं आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं. 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकतं, असा पोलिसांना अलर्ट आला आहे. तर आज देशात हिंदू असूनही देशात पुन्हा वैदिक परंपरा सुरू कराव्या अशी मागणी होत आहे. आरआरएस किंवा विश्व हिंदू परिषद म्हटलं नसलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं आहे की, संविधान बदलणार नाही. पण जोपर्यंत मोहन भागवत हे जोपर्यंत असं म्हणत नाही. तोपर्यंत आम्ही ते मान्य करणार नाही, असंही आंबेडकर म्हणालेत.