मराठा आरक्षणाचा GR फायनल जरी झाला तरी…. प्रकाश आंबडेकर यांचा मोठा दावा काय?

| Updated on: Feb 04, 2024 | 3:01 PM

बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे  वक्तव्य महत्वाचे आहे. त्यांनी काढलेला कुणबी मराठ्यांचा विषय पुढे गेलेला नाही. जीआर अजून फायनल झालेला नाही आणि जरी अध्यादेश फायनल झाला तरी...

Follow us on

मुंबई, 4 फेब्रुवारी 2024 : राज्य सरकारच्या मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यदेशावर सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. अशातच बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केले आहे. मराठा समाजाचा निर्णय राज्य मागास आयोग घेणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे  वक्तव्य महत्वाचे आहे. त्यांनी काढलेला कुणबी मराठ्यांचा विषय पुढे गेलेला नाही. जीआर अजून फायनल झालेला नाही आणि जरी अध्यादेश फायनल झाला तरी त्या अध्यादेशाला कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागणार आहे, असा मोठा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. पुढे ते असेही म्हणाले की, मराठा समाजाने गेल्या ७० वर्षांत स्वता:ची अशी परिस्थिती ओढवून घेतली आहे, ही सत्य परिस्थिती विसरुन चालणार नाही. मराठा समाजात नेहमी दोन गट राहिले आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून हे दोन गट राहिले आहेत. नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर बघा व्हिडीओ?