जुन्या पेन्शनबाबत प्रकाश आंबेडकर यांचं मोठं भाष्य; म्हणाले, पेन्शनची मागणी लावून धरा…
'मतदान आणि मतावर आपला परिणाम होणार त्यामुळे जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपला मुद्दा लावून धरावा,' असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या संघटनांना केले आहे.
वाशिम, १७ डिसेंबर २०२३ : लोकसभा निवडणुकीआधीच जुन्या पेन्शनची मागणी लावून धरावी, जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर यांनी असे भाष्य केले आहे. प्रकाश आंबेडकर असेही म्हणाले की, येत्या मार्च, एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होतील आणि निवडणुकीची आचारसंहितेच्या नावाखाली मतदान आणि मतावर आपला परिणाम होणार त्यामुळे जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपला मुद्दा लावून धरावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जुन्या पेन्शन मागणाऱ्या संघटनेला केले आहे. तर विदर्भात अधिवेशन सुरू आहे. मात्र विरोधी पक्ष कुठे दिसत नाही. विरोधी पक्ष सत्तेत विलीन झाल्याचे दिसत आहे. नागपूर इथं 82 वेगवेगळी आंदोलन झालीत, केवळ कर्मचारी पेन्शनवर चर्चा झाली. आमदार, खासदार यांच्या भानगडी काढणार म्हणून सांगितल्यावर थातूर मातूर चर्चा झाल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.