‘वडिलांना मुलगी चप्पल घालते याचं मार्केटिंग झालंय’, शरद पवार अन् सुप्रिया सुळे यांच्यावर कुणाचा निशाणा?

| Updated on: Oct 02, 2023 | 11:22 PM

VIDEO | वडिलांना मुलगी चप्पल घालत याचं मार्केटिंग झालं आहे, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शऱद पवार अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. बघा नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

मुंबई : 2 ऑक्टोबर 2023 | लातूर दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यातील बाप-लेकीचं नातं आणि त्यातील जिव्हाळा पुन्हा एकदा समोर आला होता. लातूर जिल्ह्यातील किल्लारीच्या भूंकपाला आज ३० वर्ष पूर्ण झाले त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे लातुरात होते. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या पायाशी बसून त्यांनी स्वतःच्या हाताने पवारांच्या पायात चप्पल घातली. हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान, वडिलांना मुलगी चप्पल घालत याचं मार्केटिंग झालं आहे, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शऱद पवार अन् सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली. निवडणूका होईपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सावध व्हा. आता मार्केटिंगचा जमाना सुरू झाला आहे. कुणाचा पेहरावदेखील वादात अडकत आहे. आपण असताना आई बापाचे काम करतोच त्याला नाही म्हणत नाही. पण, पोरगी चप्पल घालताना मार्केटिंग झालं. इथे लोकांचे प्रश्न सोडवण्याचा जमाना नाही, असेही त्यांनी म्हणत निशाणा साधला.

Published on: Oct 02, 2023 11:15 PM
कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसैनिकांकडून चोप, मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले, ‘माज केला तर…’
‘नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते…’, केंद्रीय मंत्र्यांनी संस्कृतीची आठवण करून दिली