प्रकाश आंबेडकर यांनी केलं अजित पवार यांचं कौतुक; म्हणाले…
VIDEO | पहाटेच्या शपथविधीमागचं रहस्य सांगत प्रकाश आंबेडकर यांनी केलं पहिल्यांदाच अजित पवार यांचं कौतुक. नेमकं काय म्हणाले?
बदलापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं कौतुक केल्याते पाहायला मिळाले. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली. त्यावरूनही त्यांच्यावर आजही टीका केली जात आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. केसेस काढून घेण्यासाठी अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी उरकून घेतला. केसेस काढून घेण्यासाठी अजितदादांनी हे केलं असं मला वाटतं. आपल्या केसेस विथड्रॉ केल्या. केसेस काढून घेतल्यानंतर अजितदादा सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा एनसीपीमध्ये गेले, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. तर बाजार समितीच्या निकालावर बोलताना आंबेडकर म्हणाले, बाजार समितीचे निकाल हाती आले आहेत. या निकालात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. हे बदलाचे संकेत आहेत का?, असा सवाल केला असता ते म्हणाले बाजार समितीत महाविकास आघाडीचीच सत्ता होती. त्यामुळे नव्याने काही आलंय असं मला वाटत नाही.