प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले, 2 एप्रिलपर्यंत…

| Updated on: Mar 29, 2024 | 4:17 PM

प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी नव्या आघाडीचं सुतोवाच करत माझे दरवाजे आजही बंद झालेले नाहीत. सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले, 2 एप्रिल रोजी भाजपविरोधी आघाडीची सुरुवात होईल. त्यावेली सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आमच्यासोबत कोण असेल

आम्हाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न होतोय, असं लक्षात आलं, तर 2 एप्रिल रोजी आम्ही सर्व काही क्लिअर करणार आहोत, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नव्या आघाडीचे संकेत दिले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी नव्या आघाडीचं सुतोवाच करत माझे दरवाजे आजही बंद झालेले नाहीत. सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘2 एप्रिल रोजी भाजपविरोधी आघाडीची सुरुवात होईल. त्यावेली सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आमच्यासोबत कोण असेल आणि आम्ही कुणासोबत असू? याची सर्व माहिती 2 तारखेलाच दिली जाईल. आमचे दरवाजे कुणासाठीही बंद झालेले नाहीत. आमचे दरवाजे उघडेच आहे. महाविकास आघाडीसोबतच चर्चा केली पाहिजे असं नाही. आम्ही वैयक्तिक चर्चाही करू शकतो’, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. आम्ही इतरांना सोबत घेऊन नवी आघाडी करत आहोत. कुणाला साईड ट्रॅक करू नये, सर्वांना सोबत घेऊन काम करावं असं आमचं म्हणणं आहे. 2 तारखेला सर्व काही आम्ही सांगणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

Published on: Mar 29, 2024 04:17 PM
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले शरद पवार
आगे आगे देखो…, अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?