New Delhi | महाविकास आघाडी सरकार नव्हे तर ‘महा विश्वास घातकी’ सरकार – जावडेकर

| Updated on: Nov 28, 2021 | 5:48 PM

ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कामाचा लेखाजोखा मांडताना भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार खडजंगी होताना दिसून येतेय. ठाकरे सरकारच्या दोन वर्षांवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येतेय तर त्याला महाविकास आघाडीतील नेते प्रत्युत्तर देताना दिसून येत आहेत. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनीही ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कामवार जोरदार टीका केलीय.

प्रकाश जावडेकर यांनी उद्धव ठाकरेंना अपघातानं झालेले मुख्यमंत्री म्हणत टीकास्त्र सोडलंय. राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली, पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली असा आरोपही भाजप खासदार प्रकाश जावडेकरांनी केला आहे. हे सरकार संधीसाधू सरकार असल्याचा घणाघात जावडेकरांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना जोरदार रंगू लागलाय.

मी नवे नाव देतोय, महा विश्वासघातकी आघाडी सरकार, असं म्हणत जावडेकारांनी ठाकरे सरकारचं पुन्हा नव्यानं नामकरण केलंय. अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले, काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिलं, काही मंत्र्यांनी दाऊद शी संबंधित मालमत्ता घेतली, असं म्हणत नाव न घेता जावडेकर यांनी अनेक मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.