Prashant Kishor Update | प्रशांत किशोरी सिल्व्हर ओकवर दाखल, भेटीस राष्ट्रवादीची व्यूहरचना ठरणार
सिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात बंददाराआड गेल्या दीड तासांपासून चर्चा सुरू आहे. यावेळी बंगाल मॉडेल देशात आणि महाराष्ट्रात लागू करण्याबाबत तसेच राज्यातील मविआ मॉडेल देशात लागू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं.
प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात बंददाराआड गेल्या दीड तासांपासून चर्चा सुरू आहे. यावेळी बंगाल मॉडेल देशात आणि महाराष्ट्रात लागू करण्याबाबत तसेच राज्यातील मविआ मॉडेल देशात लागू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याने या बैठकीत मोठा निर्णय होण्याचे कयास लढवले जात आहेत.
प्रशांत किशोर यांनी आज अचानक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी त्यांना भेटायला आले. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, गेल्या दीड तासांपासून या दोघांमध्ये चर्चा सुरू अस्लयाने ही सदिच्छा भेट नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय जयंत पाटीलही या चर्चेत सहभागी होण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याने ही भेट निव्वळ राजकीय असल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.