Prashant Koratkar : ‘मीच फोन केला अन् डाटा डिलीट…’, इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?

Prashant Koratkar : ‘मीच फोन केला अन् डाटा डिलीट…’, इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?

| Updated on: Mar 27, 2025 | 10:47 AM

फरार असलेल्या कोरटकरला अखेर दोन दिवसांपूर्वी तेलंगणमधून अटक करण्यात आली आहे. तर कोल्हापूरमध्ये आणून न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना मीच फोन केला होता, अशी कबुली प्रशांत कोरटकरने दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या आरोपी प्रशांत कोरटकट यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी सूत्रांच्या माहितीने समोर येत आहे.  इंद्रजीत सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली देत नंतर मोबाईलमधील डाटादेखील डिलीट केला असल्याचेही प्रशांत कोरटकरकडून सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यरात्री 5 तास कोरटकरची चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच चौकशीत प्रशांत कोरटकरने कबुली दिली आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान,  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंतांना धमकी दिली होती, असा आरोप आहे. गेल्या 24 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंतांना फोन केला होता. त्यानंतर 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तेव्हापासूनच प्रशांत कोरटकर हा फरार असल्याचे समोर आले होते.

Published on: Mar 27, 2025 10:47 AM
Santosh Deshmukh Case : ‘मीच अपहरण केलं अन् हत्या…’, पोलीस कोठडीत सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
Dhananjay Deshmukh : सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; ‘…तोपर्यंत समाधानी नाही’