कोल्हापूरच्या प्रतीक पाटील याचा नादखुळा, 23 व्या वर्षी बनला कृषी विभागाचा उपसंचालक
VIDEO | वाह रं पठ्ठ्या... 23 वर्षी कोल्हापूरच्या प्रतीक पाटील बनला कृषी विभागाचा उपसंचालक, बघा व्हिडीओ
कोल्हापूर, 6 सप्टेंबर 2023 | कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली इथल्या प्रतीक पाटील या अवघ्या 23 व्या वर्षी कृषी विभागाच्या उपसंचालक पदी गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात प्रतीक न हे यश मिळवल आहे. तळसंदे इथल्या डी वाय पाटील कृषी विद्यापीठातून बीएससीची पदवी प्राप्त केलेला प्रतीक गावातील पहिलाच क्लासवन अधिकारी ठरला आहे. त्याच्या यशाचं गावात कौतुक होतय. प्रतीकचे वडील गावचे माजी सरपंच आहेत. मात्र प्रतीक न वडिलांच्या मागे राजकारणात न जाता प्रशासकीय सेवेत यश मिळवत एक वेगळा संदेश देखील दिला आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना संधी देखील आहे मात्र थोडा संयम ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत देखील यश मिळवू शकतात असं प्रतीक न या यशानंतर म्हटलय. तर शेती आणि घरचे काम सांभाळत प्रतीक या मिळवलेल्या यशाचं त्याच्या आई-वडिलांसोबत नातेवाईकांना देखील कौतुक वाटतंय.