माझ्या अश्रूंवर टीका केली, त्यांना माफी नाही; प्रतिभा धानोरकरांचा रोख कुणावर?
प्रतिभा धानोरकर यवतमाळमध्ये बोलताना म्हणाल्या, कुटुंबप्रमुख गेल्याने माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. कुटुंब प्रमुख गेल्याने माझ्यावर घरची जबाबदारी आणि राजकीय जबाबदारीही माझ्यावर आली. या जबाबदऱ्या सांभाळत असताना दोन अश्रू डोळ्यातून निघाले तर...
मला त्यांनी माफ करावं हा विषय नाही पण मी त्यांना माफ करेन, प्रतिभा धानोरकर यांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. माझ्या अश्रूंवर सुधीर मुनगंटीवर यांनी टीका केली होती. त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांना मी माफ करणार नसल्याचे प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे. प्रतिभा धानोरकर यवतमाळमध्ये बोलताना म्हणाल्या, ‘कुटुंबप्रमुख गेल्याने माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. कुटुंब प्रमुख गेल्याने माझ्यावर घरची जबाबदारी आणि राजकीय जबाबदारीही माझ्यावर आली. या जबाबदऱ्या सांभाळत असताना दोन अश्रू डोळ्यातून निघाले तर विरोधी पक्षाचे उमेदवार त्या अश्रूंचे भांडवल करतो, याची मला कल्पना नव्हती. मी उमेदवार आणि एक विधवा महिला म्हणून त्यांना माफ करणार नाही तर माझ्या भागातील सर्वच महिला त्यांना माफ करणार नाही. हा अपमान फक्त माझ्या एकटीचा नाही तर माझ्या भागातील प्रत्येक महिलाचा आहे,’, असे धानोरकर म्हणाल्या.