Pravin Darekar | सहानुभूती नको विलीनीकरणाचा निर्णय द्या – प्रवीण दरेकर

| Updated on: Nov 23, 2021 | 6:23 PM

एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात काल तेरावं आणि आज चौदावं घातलं. तरी पिंडाला शिवायला हे तयार नाहीत, असा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना लगावलाय. दरेकर यांनी आज आझाद मैदानावर जात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी एसटीवर दगडफेक किंवा कुठे हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. तो सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे, असा आरोप केलाय.

गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आवाहन मी पाहिलं, ऐकलं. त्यांनी सांगितलं की लोकशाही मार्गानं आपल्याला आंदोलन करायचं आहे. मग एसटीवर दगडफेक कोण करतंय. आमचा कर्मचारी तर हे करु शकत नाही. म्हणून माझ्या मनात शंका आहे की हिंसाचार घडवून आणायचा आणि हे आंदोलन मोडित काढायचं हा सरकारचा डाव आहे. त्यामुळे आंदोलन शांततेत करण्याचं आवाहन दरेकर यांनी केलंय. त्याचबरोबर केवळ सहानुभूती नको तर एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय घ्या, अशी आक्रमक मागणी पडळकर यांनी आज केलीय.

Published on: Nov 23, 2021 06:23 PM
Deepak Kesarkar| माझ्यावर टीका केल्याशिवाय राणेंचे राजकारण पूर्ण होत नाही- केसरकर
एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी पडळकर आणि खोत बैठकीसाठी सह्याद्रीवर दाखल