Special Report | Pravin Darekar यांना Ajit Pawar यांचा टोला-tv9
आज विधानसभेत प्रवीण दरेकर विरुद्ध अजित पवार सामना होताना दिसून आला. प्रवीण दरेकरांवर मुंबई बँक प्रकरणात आरोप झाल्यापासून प्रवीण दरेकर साखर कारखान्यांना टार्गेट करून आरोप करत आहेत.
मुंबई : आज विधानसभेत प्रवीण दरेकर विरुद्ध अजित पवार सामना होताना दिसून आला. प्रवीण दरेकरांवर मुंबई बँक प्रकरणात आरोप झाल्यापासून प्रवीण दरेकर साखर कारखान्यांना टार्गेट करून आरोप करत आहेत. या कारखान्यांना दिलेली कर्ज ही बेकायदेशीर असल्याचा आरोप सतत भाजपकडून होत आहे. आजही दरेकरांनी यावरून अजित पवारांना सावला केले. दरेकरांच्या आरोपांना उत्तर देताना अजित पवारानी मोठी घोषणा केलीय. यापुढे कोणत्याही साखर कारण्याला हमी देणार नाही, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. तसेच काही कारखाने सरकारने विकत घेतले. त्यातले काही कारखाने बंद आहेत. या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी कर्ज काढले, असे स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिले आहे.