Sarangli Mahajan Video : ‘मुंडे बहीण-भावाला शेवटी ६ फुटाच्या पांढऱ्या चादरीतच जायचंय’, धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंच्या मामीचा घणाघात

| Updated on: Jan 19, 2025 | 11:20 AM

मुंडे बंधू-भगिनींच्या मामी सारंगी महाजन यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.

‘मुंडे बहीण-भावाला ६ फुटाच्या पांढऱ्या चादरीतच जायचं आहे. धनंजयला आत घाला जेलची हवा खाऊ द्या.. गोपिनाथ मुंडे यांनी कमावलेली इज्जत बहीण-भावाने मातीत घालवली.’, दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी मुंडे बहीण-भावावर जोरदार हल्लाबोल केलाय. सारंगी महाजन यांनी मस्साजोग येथे जात संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कंबरेला पदर खोचून लेकरांसाठी तरी खंबीरपणे उभे रहा, अशी विनंती सारंगी महाजन यांनी आश्विनी देशमुखांना केली. सारंगी महाजन यांनी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशीही संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर सारंगी महाजन यांनी जोरदार निशाणा साधला. तर जमीन प्रकरणाविषयी बोलताना सारंगी महाजन म्हणाल्या, ‘धनंजय मुंडे यांनी माझ्या जिरेवाडीतील तीन कोटीची जमीन हडपली. त्यात पंकजा मुंडेचाही हात आहे. धनंजय मुंडे यांच्या घरातील नोकराच्या नावे ही जमीन केली. मला धमकावत कोऱ्या बॉण्ड पेपरवर सह्या घेतल्या. सह्या केल्या नाहीतर परळीतून बाहेर जाऊ देणार नाही ,असा दम दिला. धमकावतच जमिनीची रजिस्ट्री धनंजय मुंडेंच्या माणसाने करून घेतली.’, असे अनेक आरोप केलेत. बघा नेमकं काय म्हणाल्यात?

Published on: Jan 19, 2025 11:20 AM
Buldhana Hairfall Issue Video : टक्कल व्हायरसमुळे कुणी पोरगीही देईना! बघा सध्या काय परिस्थिती?
Walmik Karad Property Video : वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या कारनामांची मालिका सुरुच, दुसऱ्या पत्नीच्या नावे 36 एकर जमीन अन्…