Pravin Darekar | फोन हिसकावून एसटी कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं: प्रवीण दरेकर
सरकार एसटीचं आंदोलन दडपण्याचं काम करत आहे. आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवलं जातंय. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रकार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 40 एसटी कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.
सरकार एसटीचं आंदोलन दडपण्याचं काम करत आहे. आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवलं जातंय. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रकार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 40 एसटी कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर दडपशाही करत असल्याचा आरोप ही दरेकर यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आम आदमी पक्षानं देखील समर्थन दिलं आहे. आझाद मैदानात st कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आजाद मैदानात आंदोलन सुरु आहे.. st ला राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी st कर्मचारी करत आहे..