Pravin Darekar| जोर का झटका धीरे से लगा; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
जिल्हा बँकेतील भाजपच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत, सिंधुदुर्गात सध्या भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे, शिवसेना विरुद्ध राणे अशी प्रतीष्ठेची निवडणूक भाजपने जिंकल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांचे हौसले सध्या बुलंद आहेत.
जिल्हा बँकेतील भाजपच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत, सिंधुदुर्गात सध्या भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे, शिवसेना विरुद्ध राणे अशी प्रतीष्ठेची निवडणूक भाजपने जिंकल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांचे हौसले सध्या बुलंद आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 19 पैकी 14 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर 5 जागा महाविकास आघाडीला जिंकता आल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.