Video | संजय राऊत-आशिष शेलार यांच्यात गुप्त बैठक, प्रविण दरेकरांच्या प्रतिक्रियेनंतर गूढ वाढलं
आगामी पावसाळी अधिवेशनाच्या आधी राज्यात बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. सध्या भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात एक गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते आहे.
मुंबई : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या आधी राज्यात बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. सध्या भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात एक गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते आहे. या दोन नेत्यांच्या बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. भाजप कुणालाही ब्लॅकमेल करत नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. भाजप हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे, असंही दरेकर यांनी सांगितलं. तसेच शिवसेनेने हात पुढे केला तरी आम्ही विरोधातच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. दोन नेते एकमेकांना भेटू शकतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.