Video | कळवा दुर्घटनेला भूमाफियाच जबाबदार, त्यांच्यावर मोक्का लावा : प्रविण दरेकर
गरीब स्वस्त झोपडं मिळतंय म्हणून त्या ठिकाणी राहायला जातो. त्यामुळे अशा भूमाफीयांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली.
मुंबई : कळवा येथे झालेली दुर्घटनाही ही अतिशय दुर्दैवी असल्याचे प्रविण दरेक म्हणाले. मुंबईतील चेंबूर, विक्रोळी, भांडूप यानंतर ही घटना घडली आहे. मला वाटतं प्रशासनाला, पालिकेला तसेच सरकारला डोळ्यात अंजन घालायला लावणाऱ्या या घटना आहेत. या चरही ठिकाणी ज्या घटना घडल्या त्या डोंगरावील वस्त्यांमध्ये झाल्या. दरड, भिंत कोसळून या घटना घडल्या. मुंबई, ठाण्यात अशा प्रकारचे काम भूमाफीया करतात. गरीब स्वस्त झोपडं मिळतंय म्हणून त्या ठिकाणी राहायला जातो. त्यामुळे अशा भूमाफीयांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली.